वेळ कूणासाठी थांबत नाही आणि आपणही आपल्या रत्यावर चालत राहतो, न थाबंता. त्या रत्यावर मग वळणं येतात, चढ उतार येतात आणि विश्रांतीची जागाही येते. भूतकाळातले हिशेब मांडायला ही जागा चांगली. नूसतेच ऐहिक हिशेब नाहीत तर नात्यांचेही हिशेब. माझ्या जून्या नव्या नात्यांमधे ठळक पणे आठवणारं एक नातं..समीरचं आणि माझं. ते नातं संपल्याची रुखरुख लागते. ते नातं थांबवून मी पूढे का निघून आले तेही आठवतं. आणि मग पुढचा रत्ता चालण्याचा हुरुप टिकून रहतो. खर तर त्याच्या आणि मझ्या नात्यातला गधं कधीच विरून गेलाय. पण तरीही त्या सूखलेल्या पाकळ्या मनाच्या पुस्तकात कुठतरी दडवून ठेवल्यात. का कुणास ठाऊक?