Saturday, March 27, 2010

बरेच लोक बय्राच गोष्टी करतात. बय्राचजणांना त्या बय्रापैकी जमतात. त्या गोष्टी बघून मी बय्राच वेळा प्रोत्साहीत होतो (निष्कारण). असाच एकदा प्रोत्साहीत होउन कविता करण्याचा मी केलेला (आणि फसलेला) प्रयन्त.

|| ही आहे IIT university shuttle ची कहाणी ||

या बसा लवकर अशी म्हणतेय गाडी,
तुमच्याचसाठी ठेवली आहेत दारे उघडी.

धावा लवकर बाहेर आहे बरीच थंडी,
पण जपून, नाहीतर होइल घसरगूंडी.

बाहेर आहे थंडी तरी उबदार माझी मांडी,
चिल्यापिल्यांसाठी फुकटात क्यांडी.

सूटते इतक्या वेगात की सगळ्यांना मागे मी पाडी,
फायरिंग एकून माझे लाजते आगगाडी.

मी निघाले लगेच होता जाण्याची घडी,
माहीत आहे त्याला म्हणूनच पळतोय तो गडी.






(My comment: This is ridiculous!)

Monday, March 22, 2010

चौथीच्या त्या चंद्राची कोर

सहजच खिडकीतून बाहेर पाहिलं अनं तिची झलक दिसली. काळ्याभोर आकाशात दिमाखात झळकत होती. इतकी नाजूक, इतकी उजळ, इतकी नितळ...चौथीच्या त्या चंद्राची कोर! आणि तिच्या भोवती घेरा घालणाय्रा त्या चादंण्या. जणू त्या चंद्रकलेचा पदरचं.

पण तिलातर तिच्या सौदर्याचं काही घेणं देणंच नाही. तिलातर ओढं लागलीय पूर्णत्वाची. कलाकलानं पूर्ण व्हायची पून्हा हळूहळू नामशेष होण्यासाठी. आणि तेव्हाच मला आधार वाटतो. नामशेष झाली तरी पून्हा तिची झलक मिळणार आहे या विचारान...