Email account open केलं तर पहिलच email त्याचं, "From समीर". Email मधली link click केली तर 1 page open झालं. Page वर होता त्याचा आणि तिचा photo. आणि photo खाली मोठ्या अक्षरात YOU ARE INVITED! time, venue वगरे वगरे . लग्नाला जाणं अशक्य होतं पण तरीही सर्व मजकूर नीट वाचला. Reply केला - "Congratulations!"
***********
लग्नानतंर १-२ महिन्यानी online दिसला. इतक्या रात्री online काय करतोय विचारलं तर म्हणाला US मध्ये आलोय.
मी - Hi, How are doing? How do you like US.
तो - Hey, I am good. Kinda busy right now can't chat. Give me your number.
मी - If can't chat now then how about catching up on weekend for dinner?
तो - Sure. I will call you to decide.
बाकोशी बोलून दुसय्रा दिवशी phone केला आणि dinnerला येतो म्हणून confirm केलं.
***********
आज दिवसभर काम चालू आहे. अर्धा दिवस तर मी स्वयंपाकातच घालवला. हे सगळं तो संध्याकाळी जेवायला येणार म्हणून. I don't know if he even deserves this from me.
***********
ठरवलेल्या वेळे प्रमाणे दोघे आले. छान आहे त्याची बायको. ती कशी आहे, काय करते, कूठून आली याचा अभ्यास सूरू होता माझा. नकळतं स्वत:शी compare करत होते मी तिला. माझी पण heightच आहे.
तो मात्र तसाच वाटला. अगदी पूर्वि सारखा. बर्याच आठवणींना त्यानं
ऊजाळा दिला. त्याची अोळख पून्हा नव्यानं पटली.
***********
गप्पा टप्पा झाल्या, जेवणं झाली. and then was the time to say goodbye. त्यानं हात पूढं केला shake hand करण्यासाठी. I held it and I didn't want to let it go and neigher did he (मला तरी असचं वाटलं) आणि क्षणभरातचं आम्ही सावारलो. Because we care; not for ourself but for our better-half.