Tuesday, April 5, 2011

तिच्या हसण्याच व्यक्तिमत्व

तिच्या हसण्याला सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे.

चालता चालता भेटली की मागे वळून, ओठांची सरळ रेष हलकेच मोडून स्मित हस्य देणारी ती. अनोळखी असूनही ओळखीची व्यक्ती वाटते.

कधी जेवणाच्या table वर तर कधी मित्रांच्या घोळक्यात गप्पा मारताना खळखळून हसणारी ती. एखाद्या लहान मूला सारखी.

'Thank you' म्हणणार असेल तर मान तिरकी करून , ओठांमधील अंतर वाढवून, निकोप हसणारी ती. तिचे फक्त ओठच नाही हसतं, तर तिचे डोळेही हसतात. अगदीच निरागस.

मात्र हसायचं नसताना हसावं लागलं तर ओठ एकाच दिशेला सरकवून हसण्याची नक्कल करणारी ती. मनातल्या मनात 'who cares' किंवा गेला वूडत म्हणत असावी कदाचित.

office संपवून घरी जायच्या वेळेस goodbye म्हणताना डोळ्याला डोळे भिडवून, भावना विरक्त होऊन हसणारी ती. जावं तर लागणार पण जावसं न वाटणाऱ्या प्रेयसी सारखी.

तिच्या बद्दल बोलताना, तिची स्तुती करताना मान खाली घालून गालातल्या गालातचं हसणारी ती. एखद्या विजयी स्त्री सारखी.

तिच्या हसण्याला सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे.

No comments: