मराठीत ब्लोग लिहावा ही सुबुध्दी झाली चार अमेरीकन मित्रांमूळे. अर्थात त्यांनी मला स्पष्ट सांगितल नाही पण त्यांची passion बरच काही सांगून गेली. हे लोक फक्त स्वतःच्या passion साठी जगतात. खर तर हा आपल्या आणि त्याच्या जडणघडणीतला फरक. बर कोणती योग्य आणि कोणती अयोग्य हा प्रश्न निराळा. इथे योग्य अयोग्य हा व्यक्तीगत प्रश्न. आणि म्हणूनच ते passionने जगू शकतात.
आपल्याकडेही आहे व्यक्ती स्वातंत्र्य, पण म्हणायला. आपण सर्रासपणे आपले विचार, आपली मतं, आपल्या अपेक्षा आणि आपली कामं दुसर्यावर लादत असतो. हो आणि दुसरा आपल्या वर. स्वतःच्या मनाला काय हवयं याचा कोणीच विचार करत नाही. मीही त्याला अपवाद नाही...
डोळे बंद करतो...मी दिसतो...असंख्य दगडांवर पाय ठेउन उभा राहण्याचा प्रयत्न करणारा. ते दगड म्हणजे माझे career interests. त्यातल्याच एखद्या दगडावर आयुष्यभराचा प्रवास करायचा होता...असो. आता जे आहे तेच सत्य आणि ते महत्वाचही आहे. हे विचार इतके दाटले की वाटल हे लिहावं आणि मग वाटलं की लिहावं. मनातले सगळे विचार लिहावेत. बरं मराठीत लिहीले नाहीत तर मग खय्रा अर्थाने व्यक्तच होता येणार नाही. बघुयात हा विचार कीती सफल होतो ते.
बरच उशीर झाला आहे. पुन्हा भेटु.
Sunday, June 7, 2009
नवी सुरवात
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
लिखाणाची हिच मजा आहे राव ... आलं मनात की टाक लिहून नाहीतर नंतर ती पॅशन (लिहायची) पण रहात नाही आणि लिहायलापण मजा येत नाही.
तू ऊभ्या असलेल्या असंख्य दगडामधला एखादा दगड निसटून गेल्यासारखे विषय निसटतील.
लिहीत रहा ...
Post a Comment