Friday, February 5, 2010

काल पहिल्यांदा Titanic पहिला (हो पहिल्यांदा!). सिनेमा तर सुंदर आहेच. आणि काही सीन्स तर अप्रतिमच आहेत :) असाच एक क्षण मनात खिळून राहीला आहे.

सीन असा...पाण्याने जहाजाचा ताबा घेतलाय. जहाजाचं डोकं पाण्यात बुडालं आहे. डेकवर वाद्यव्रूंद शांतपणे संगीत वाजवत आहेत. इतर प्रवसी मात्र जीव वाचवायचा प्रयत्न करतायत.

संगीताचा तो तुकडा संपतो, आणि वाद्यव्रूंद आपला गाशा गुंडाळू लागतात. इतक्यात, परिथिती हाताबाहेर गेलेली पाहून captain कंत्रोल रूम मधे जातो. अगदी हताश होऊन! मरण आलं तरी ते इथेचयावं असा निर्धार. captainच हे समर्पण पाहून परत निघलेला तो वाद्यव्रूंद माघारी फिरतो आणि पुन्हा संगीत सुरु होते.

कहीही संबंध नसताना हे बंध जोडले जातात. दुसय्राच्या कर्तव्याला आपण आपण आपलीच जवाबदारी मानू लागतो. त्यात चूक कहीच नाही उलट मोठेपणाच आहे. आणि हे मोठेपण दाखवायला एखादं जहाजच बुडायला हवं असं काही नाही. एखाद्या मोठ्या कपंनीतला छोटा क्लार्क देखील हे मोठेपण दाखऊ शकातो. जहाज वाचेल किंवा नाही, ते आपलं कर्तव्य असेल किंवा नसेलही. पण आपली जवाबदरी आपण ओळखयला हवी, नाही का?

No comments: