तुला मला चोहीकडे,
माझे तुझे होती भास
माझे तुझे होती भास
आसवांचा सहवास
तुझे दूर जाणे झाले नेहमीचे
उरलास तरी तुझा सुवास
मी किती चिडायचो तू तयार व्हायला वेळ लावतेस म्हणून. पण आता गाडी सुरु करून तसाच बसून राहतो, तू शेजारच्या seat वर येऊन बसणार नाहीस तरी.
ती थाबलेली रात्र तुझ्या coffee ने आणखीनच उबदार व्हायची. आता ती रात्र थांबत तर नाहीच, पण जाता जाता मन गोठउन ज...ाते.
मला आठवतंय तू एकदा sweater वीणताना लोकरीचा गुंता झाला होता. खूप प्रयत्न केला आपण तो गुंता सोडवायचा पण शेवटी frustrate होऊन कापून काढला तो. मला ती strategy नेहमीच सोइस्कर वाटली.
तुला नेहमी म्हणायचो मी की, तू तुझ्या वस्तू वेंधळ्या सारख्या हाताळतेस म्हणून. मी मात्र माझी नातीचं वेंधळ्या सारखी हाताळली.
वाटत राहतं की माझं काहीतरी राहिलंय तुझ्याकडे. काय ते माहित नाही. सारखं आठवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तूझ्या आठवणीनं रोजचं जगणं जगतोय.